नगरच्या शौनक खराडेने पटकावला आर्यनमॅनचा किताब.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगरच्या शौनक खराडे याने अहमदनगरची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचवत मानाचा आर्यनमॅन हा किताब पटकावला आहे.ही स्पर्धा पार केलेला 'शौनक' हा नगर जिल्ह्यातील पहिला व्यक्ती ठरला असून शौनक ने त्याचे ट्रेनिंग पुण्यात पूर्ण केले आहे.ट्रायल मॅरेथॉन आर्यनमॅन ही जगातील एक अत्यंत खडतर क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते   ३.८ कि.मी स्वीमिंग,१८० कि.मी सायकलिंग आणि ४२ कि.मी रेसिंग हे अंतर अवघ्या साडे पंधरा तासात पूर्ण करण्याचे आव्हान असते.शौनकने जर्मनी येथे झालेल्या या रेसमध्ये सहभागी होत चौदा तास ४४ मिनिटे वेळेत हे अंतर पार केले.त्याचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
------------------------------

Powered by Blogger.