भारत- इंग्लंडमध्ये आज रात्री रंगणार पहिला टी-20 सामना.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आज रात्री भारत आणि इंग्लंडदरम्यान टी-20 मालिकेतील पहिला सामना मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफॉर्ड ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता हा सामना सुरु होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ही खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. 

Loading...
सुरूवातीपासूनच अनेकांचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे. सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला काही धक्के बसले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने ते हा सामना खेळणार नाहीत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे लक्ष टाकू.

- आयसीसी टी- 20च्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.

- आतापर्यंत भारत आणि इंग्लंड दरम्यान 11 टी- 20 सामने खेळण्यात आले. यातील 5 सामने भारताने जिंकले असून 6 सामन्यावर इंग्लंडने विजय संपादन केला आहे.

- भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने केल्या होत्या. मॉर्गनने 8 सामन्यांमध्ये ऐकूण 284 धावा केल्या होत्या. तर भारताकडून 10 सामन्यांमध्ये सर्वाधिक 265 धावा सुरेश रैनाने केल्या होत्या. रैनानंतर धोनीने इंग्लंडविरुद्ध 11 सामन्यांमध्ये 264 धावा केल्या होत्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.