केडगावात शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने मारहाण,६ जणांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील तिघा जणांना ६ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गजाने मारहाण करून भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडणाऱ्या मुलास कोयत्याने मारहाण करण्याची घटना घडली असून, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
या घटनेत आई-वडिलांसह मुलाला जबर मारहाण करण्यात आली आहे.. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छाया बंडू चव्हाण (रा.शास्त्रीनगर, केडगाव) या मजुरी करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुनील मधू चव्हाण, पुष्टर मधू चव्हाण, प्रशांत दीपक चव्हाण, दीपक पुष्टर चव्हाण, ओपन पुष्टर चव्हाण, प्रियंका दीपक चव्हाण (सर्व रा.शास्त्रीनगर, केडगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून चव्हाण यांच्या घरासमोर येवून तुम्ही येथे कसे-काय राहता? असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गजाने मारहाण केली. 

ही भांडणे सोडविण्यासाठी चव्हाण यांचा मुलगा विपुल आला असता त्यालाही कोयत्याने मारहाण करत दमदाटी केली, तसेच घरातील सामानाची, दुचाकीची तोडफोड करत घरातील सामान जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात छाया चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांविरुद्ध आर्म ॲक्टसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि. गवळी हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.