गटतट,पक्ष न पाहाता काम करणार-खा.सदाशिव लोखंडे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सतरा दिवसांत खासदार करतांना सर्वांनी मदत केली असल्याने गटातट पक्ष न पहाता सर्वांचे येईल ते काम मी खासदार नात्याने करत राहील, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. . नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारातील त्रिवेणीनगर येथे खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या हायमॅक्स पथदिव्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 


Loading...
यावेळी माजी सरपंच भिवाजीराव आघाव यांच्या पुढाकारातून सुमारे ५० वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार, माजी जि.प. सदस्य तुकाराम शेंडे, अशोकराव थोरे, नियोजन कमिटीचे सदस्य दिनकरराव गर्जे, पं.स. सदस्य रावसाहेब कांगुणे, किशोर जोजार, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, डॉ.चेतन लोखंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, कुंडलिक दादा चिंधे, भगवानराव जाधव, वनक्षेत्रपाल गंगाधर सातपुते व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक भिवाजी आघाव यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. स्वखर्चातून येथे पिंपळ, उंबर, वड ही देशी झाडे या ठिकाणी लावून संगोपन करणार आहे. वृक्षांची जोपासना होण्यासाठी वृक्षतोडीच्या कायद्यात गांभीर्याने लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.खा. लोखंडे म्हणाले, नेवासा तालुक्यात सर्वसामान्य माणसानेमला मतदान केले आहे. इतर नेत्यांनी ही साथ दिली आहे. त्यामुळे गट-तट न बघता काम करण्याची भूमिका राहील. मुळाचे आवर्तन लवकर सुटावे म्हणून वरिष्ठांना शिफारस करेन, अशी ग्वाही दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.