संगमनेर तालुक्यात १५ वर्षीय मुलाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील साकूर येथे एका पंधरा वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२९) दुपारी दीड वाजेच्या पूर्वी घडली. रितेश नीलेश तिरवाडी असे या मुलाचे नाव आहे. त्यामुळे तिरवाडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रितेश हा आपल्या कुटुंबासह साकूर याठिकाणी राहत होता. तसेच तो शिक्षण ही घेत होता. त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने रितेश हा सगळ्यांना परिचीत ही होता. पण रविवारी दुपारी त्याने आपल्याच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रितेशने आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे अनेकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तर साकूर गावातील व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपआपली दुकाने बंद केली होती. त्यानंतर संध्याकाळी रितेशवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.