खंडाच्या जमिनीचा ताबा मिळावा यासाठी पेट्रोल ओतून घेतले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खंडकरी जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील दोन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वडाळा महादेव येथील नारायण माधव राऊत व अशोक माधव राऊत या दोन शेतकऱ्यांनी काल सकाळी पावनेबाराच्या सुमारास शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या प्रांत कार्यालयाच्या दरवाजासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

Loading...

याप्रकरणी प्रांत कार्यालयातील कर्मचारी योगेश आत्माराम भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर २५२ अन्वये भा.दं.वि. कलम ३०९ प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाची जमीन मिळावी, यासाठी राऊत बंधू अनेक दिवसांपासून प्रांत कार्यालयाच्या चकरा मारत होते. यासंदर्भात त्यांनी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता, असे समजते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.