आईसह चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील प्रियंका महेश देशमुख (वय २२) व सोहम महेश देशमुख (वय २) हे दोघेही स्कुटीवरून विहिरीत पडल्याने या दोघाचांही विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २९) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका देशमुख या आपल्या कुटुंबासोबत जवळे कडलग याठिकाणी राहत आहे. प्रियंका या दोन वर्षीय मुलगा सोहम आणि सासूबाई छाया दगडू देशमुख असे तिघेजण स्कुटीवरून रविवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास विरगाव (ता.अकोले) वरून गणोरेमार्गे जवळे कडलगकडे येत होते. Loading...
त्याच दरम्यान गतीरोधकवरून स्कुटी गाडी आदळली आणि गाडीवरचा त्यांचा ताबा सुटला. त्यानंतर सासुबाई छाया देशमुख या खाली पडल्या. त्यानंतर प्रियंका आणि त्यांचा दोन वर्षांचा सोहम हे दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याने दोघांचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

त्या दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदना साठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने जवळे कडलग गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.