शिवसेना 'अर्बन' च्या निवडणूक रिंगणात ताकदीने उतरणार : अनिल राठोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमच्याकडे भांडेच नाही, तर तुम्ही काय आमचा भांडाफोड करणार, उलट आम्हीच तुमचे माठ फोडू असा गर्भित इशारा शिवसेना उपनेते अनिल भैय्या राठोड यांनी खा. दिलीप गांधींना दिला. आगामी काळात अर्बन बॅंक निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार असल्याचेही राठोड यांनी यावेळी सूचित केले. 

शिवसेनेचा कोणीही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार नाही उलट राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट यावेळी राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.. शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेला माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, संजय शेंडगे, सुरेश तिवारी, सचिन शिंदे, अक्षय कातोरे उपस्थित होते. 

Loading...
यावेळी बोलताना राठोड म्हणाले, शिवसेनेत लोकशाही आहे. शिवसेनेमुळे लोकांचे प्रश्न सुटत आहेत. त्यामुळे सर्वात जास्त आंदोलने शिवसेनेच्या काळात झाली आहेत. असे सांगताना नगर शहरासाठी तुम्ही किती रुपयांचा निधी आणला. तुम्ही एक रुपयांचाही निधी न आणल्याने तुम्हाला विचारण्याचा अधिकार काय? 

केंद्र सरकारने सर्व मनपांना अमृत योजना मंजूर केलेली आहे. या योजनेचे श्रेय तुम्ही कसे काय घेता असा सवाल राठोड यांनी खा. गांधींना केला. त्यांच्याकडून केवळ जनतेची दिशाभूल सुरु आहे. असा आरोप करुन सेनेच्या प्रयत्नामुळेच भुयारी गटार योजना मार्गी लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.