३१ ऑगस्टपूर्वी साईकृपा शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट देणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुणोरे येथील शेतकरी अमोल सुभाष बढे यांनी २०१५ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव साई कृपा साखर कारखान्याला ऊस दिला होता. मात्र अद्यापही त्यांना पैसे मिळाले नव्हते. प्रहार संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पदाधिकारी अजय बारस्कर, विनोदसिंग परदेशी, प्रकाश बेरड, अजित धस यांच्या पाठपुराव्यामुळे बडे यांना न्याय मिळाला आहे. 


Loading...
उर्वरित शेतकऱ्यांचेही देणे ३१ ऑगस्टपूर्वी देण्याचे आश्वासन कारखान्याने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले. प्रहार संघटनेचे संस्थापक आ.बच्चु कडू यांना याबाबत माहिती दिली. त्यांनीनगर येथील संघटनेचे अमोल यांना याबाबत माहीती दिली. 

त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना पाचपुते यांच्या घरावर निवेदनाव्दारेआंदोलनाचा इशारा देताच दि.२६ जुलै रोजी संबंधित शेतकऱ्यास पूर्ण पेमेंट मिळाले. मात्र त्याच प्रमाणे नगर जिल्ह्यातील अजून शेकडो शेतकऱ्यांचे उसाचे २० कोटी रूपये साईकृपा कारखान्याकडे थकीत असल्याचे समोर आलेआहे. कारखान्याकडून ही रक्कम दि.३१ ऑगस्ट रोजी पर्यंत जमा करण्याचे कारखान्याकडून लेखी दिले आहे. 


मात्र जर ३१ ऑगस्टपर्यंत ही रक्कम जमा न झाल्यास मा.आ.बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे अजय महाराज बारस्कर,विनोदसिंग परदेशी,प्रकाश बेरड, अजित धस, आभिजीत पोटे,लक्ष्मण दिधे, इंद्रजित काळे व विशाल परदेशी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.