हावरेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ७१ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून शिर्डी येथील स्मशानभूमीत सदरचा पुतळा जाळण्यात आला. त्यानंतर शोकसभा घेण्यात आली होती. Loading...
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पो.उप नि.संदीप कहाळे यांच्या फिर्यादीवरून कैलास गोविंदराव कोते, जगन्नाथ सूर्यभान गोंदकर, सुजित ज्ञानदेव गोंदकर, विजय उर्फ गोपीनाथ भाऊसाहेब गोंदकर, विजय तुळशीराम कोते, ताराचंद तुळशीराम कोते, मंगेश वामन त्रिभुवन, नितीन उत्तम कोते, सचिन प्रभाकर कोते, दीपक वारुळे, गफ्फारखान पठाण सर्व राहणार शिर्डी, फकीर लोढा,रा. रुई ता.राहता.,कैलास सदाफळ रा.राहता, आणि आंदोलनात सामील असलेले सुमारे शेकडो ग्रामस्थ यांच्या विरुद्ध शिर्डी पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.