पोरधरींच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका आमदार थोरात यांचे नागरिकांना आवाहन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सध्या राज्यात पोरधऱ्यांची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशा अफवांमुळे राज्यात विनाकारण 5 जणांचा बळी गेला. हे दुर्दैवी आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. 

धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे अशाच अफवेने 5 जणांचा बळी गेला. याबाबत आ. थोरात म्हणाले, की सोशल मीडियामधून अशा खूप अफवा पसरवल्या जाणे चुकीचे आहे. धुळ्यात 5 जणांचा अफवेने बळी गेला. या अफवा आहे हे पटवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. ग्रामीण भागात पोरधरी ही अफवा मोठ्या प्रमाणात पसरली. अनोळखी व्यक्‍तीवर संशय न घेता पूर्ण चौकशी करा, असेही ते म्हणाले. Loading...
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्‍यातील हल्ला धक्कादायक आहे. पुरोगामी व शांततामय महाराष्ट्रात अफवेतून जीव घेण्यापर्यंत मजल जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनी याबाबत जागरुकता बाळगावी. विशेषतः तरुणांनी अति उत्साहीपणा न दाखवता अशा व्यक्‍तींची पूर्ण चौकशी करावी. 

पोरधरींच्या अफवेमुळेच झरेकाठीच्या आबा शिंदे या बहुरुपी युवकाला मारहाण झाली होती. त्याची चौकशी करुन नागरिकांनी त्याला सोडवले. आमदार थोरात यांनी यंत्रणेला तातडीच्या सूचना देऊन शिंदे याला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याचा सत्कार व सन्मानही यावेळी करण्यात आला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.