केडगाव दुहेरी हत्याकांड ; भानुदास कोतकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकर यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी सोमवारी (दि. ९) होणार आहे. 

Loading...
केडगाव हत्याकांड या गुन्ह्यात भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोतकर यांच्या वतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी (दि. २) सुनावणी ठेवण्यात आली होती. 

आरोपीचे वकिल ॲड. महेश तवले यांनी न्यायालयात कोतकर यांच्यावरील गुन्ह्याची माहितीसाठी पोलिस प्रशासनाकडे अर्ज दाखल केला असून त्यावर अजून माहिती मिळाली नाही. तरी युक्तीवाद करण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी केली. न्यायालयाने सदर मागणी मान्य करून पुढील सुनावणी दि. ९जुलै रोजी ठेवली आहे. अशी माहिती ॲड. महेश तवले यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.