शिर्डीत वृद्धाश्रमात संगनमताने १४ लाखांचा अपहार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डीत तूप घोटाळा, बनावट दर्शन पास, अव्व्वाच्या सव्वा दराने पूजा साहित्याची विक्री, असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अशातच एका वृद्धाश्रमात दोघांनी संगनमताने तब्बल १४ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. 

Loading...
याप्रकरणी नागनाथ गुप्ता (रा. हैद्राबाद) यांनी शिर्डी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले. शिर्डी येथील श्रीकाशी अन्नापूर्नावासी आर्या, वैश्यय वृद्धाश्रम आणि नित्यान्न सत्त्रम या चॅरीटेबल संस्थेत १ एप्रिल २०१६ ते २२ ओक्टोबर २०१७ पर्यंत आरोपी एकल्ली बालकृष्णमूर्ती (रा. कापरा, हैद्राबाद) आणि व्ही. हरीश जगन्नाथ (रा. बेल्लारी, कर्नाटक) या दोघांनी संगनमताने १४ लाख १२ हजार १४५ रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.