सत्तेत असूनही विखे,थोरातांना निळवंडे प्रश्न सोडविता आला नाही - आ.शिवाजीराव कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अनेक वर्षांपासुन अधिक काळ रखडत पडलेल्या निळवंडेच्या कालव्यांसाठी निधी आणता आला नाही. आ. बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना हा प्रश्न सत्तेत असूनही सोडविता आला नाही. 

आता त्यांनी पत्रकबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टिका आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. आज केंद्रांत व राज्यात आमचे सरकार आहे, हा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे, असे ते म्हणाले.

Loading...
म्हैसगाव येथे १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम तसेच विविध विकास कामांचे भुमिपुजन व विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते. ते म्हणाले की, वाढत्या वृक्षतोडीमुळे दुष्काळ, पाणीटंचाई व त्यामुळे नापिकीसारख्या समस्या उद्भवत आहेत. पर्यावरणाची हानी होत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. वृक्ष तोडबंदी होणे गरजेचे आहे. 

नगर जिल्हा ५१ लाख वृक्षलागवड करणार आहे. त्या अंतर्गत राहुरी तालुक्यात २ लाख ८० हजार वृक्ष लावण्यात येणार असून वनविभाग तसेच विविध सामाजिक व शासकीय संस्थांच्या सहाय्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. म्हैसगाव येथे २ कोटी रुपये निधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करणे माझे कर्तव्य असले, तरी या कामांचा पाठपुरावा करणारे सरपंच, अरुण पवार यांची भुमिकाही तितकीच महत्वाची आहे. यापुढे आजीमाजी सरपंचांनी एकिने गावचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपली त्यांना साथ असेल. असेही आ. कर्डिले म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.