रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीवरून घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील दाढ बु।। येथील गोकुळ प्रकाश जंगम (वय ३३) हा युवक मंगळवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास शिर्डीहून दुचाकीवर दाढ बु।। येथे आपल्या घराकडे परतत असताना निर्मळपिंप्री - लोणी रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीवरून घसरून पडल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. 


Loading...
त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरु असताना त्याचे शनिवारी (दि.२८) पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. . त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार व्ही. टी. घोडे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.