स्वस्तात सेवा देवूनही जिओचा नफा वाढला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रिलायन्स जिओने विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ६१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीच्या तुलनेत हा नफा १९.९ टक्के अधिक मिळवला आहे. त्या अंतिम तिमाहीमध्ये कंपनीने ५१० कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. 

Loading...
कंपनीने सेवा सुरू केल्यानंतर २१ महिन्यांच्या आतच २० कोटी ग्राहक जोडले आहेत. विद्यमान वर्षाच्या या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचे परिचालन उत्पन्न ८१०९ कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या तिमाहीत हे उत्पन्न ७१२८ कोटी रुपये इतके होते. करपूर्व नफा या काळात १६.८ टक्के वाढून तो २६९४ कोटी रुपयांवरून ३१४७ कोटी रुपये इतका झाला आहे. जिओच्या ग्राहकांची संख्या आता २१ कोटी ५३ लाख इतकी झाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.