...तर एका महिन्याच्या आत मिळेल मराठा समाजाला आरक्षण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अभ्यास करणाऱ्या मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर आपला अहवाल देण्याची विनंती करण्यात आली असून, हा अहवाल हाती येताच एका महिन्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत दिला. 


Loading...
मराठा समाजाच्या आंदोलनातील हिंसाचारात अत्यंत गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील मेगाभरतीत मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी मराठा संघटनांच्या नेत्यांनी पुढे यावे, तसेच शांततेने आंदोलन करावे, असे आवाहनही मुख्यमंर्त्यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.