ग्रामपंचायतची जमीन स्वत:ची दाखवून फसवणूक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:ची दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जातप येथील नानासाहेब यशवंत वाघ व विजय नानासाहेब वाघ यांनी ग्रामपंचायतीची जमीन स्वत:च्या नावावर असल्याचे दाखवून तशी कागदपत्रे सादर केली. 

तसेच तत्कालीन सरपंच नूर सैदूमियॉँ सय्यद यांनी याबाबतचा दाखला दिला. आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा अभियंता प्रविण साकल्ये यांनी कागदपत्रांची खात्री न करता नानासाहेब वाघ यांच्या नावावर ३ लाख ४० हजार १२५ रुपयांचा धनादेश दिला. याप्रकरणी बापूसाहेब शंकरराव फुगारे (रा. राहुरी बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.