इमारतीस आग स्कॉर्पिओ गाडी जळून खाक; १५ लाखाचे नुकसान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डीपासुन काही अंतरावर असलेल्या शिर्डी-साकुरी शिवलगत असणाऱ्या एका इमारतीस भर दुपारी लागलेल्या आगीत स्कॉर्पिओ गाडी, डाळींबाचे कॅरेट जळुन खाक झाले. शिर्डी-राहाता नगरपालिकेच्या बंबाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने तसेच जवळपास राहणारे रहिवाशी मदतीला धावल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. सदर घटना शनिवार दि.२९ जुलै रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी- साकुरी शिव लगत आंध्रप्रदेश राज्यातील रंगनाथ गंधम यांची इमारत आहे. सदर इमारतीच्या तळमजल्यावर डाळींबाच्या व्यापाऱ्याचे कॅरेट तसेच भुसा होता. वरच्या मजल्यावर चार कुटुंबे राहतात. दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग आगली. आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. पार्कींगमध्ये उभी असलेल्या स्कॉर्पिओ गाडीस आग लागल्याने सदर गाडी आगीत जळुन भस्मसात झाली. डाळींबाचे कॅरेट जळुन गेले.गाडीसह सुमारे १५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आगीचे धुराचे लोळ दुरवरुन दिसल्याने जवळपास राहणारे नागरिक मदतीला धावले. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबास सुरक्षित ठिकाणी हलविणे, गॅस टाक्या घरातुन बाहेर काढण्याचे काम केले. यावेळी नगरसेवक सचिन कोते, पत्रकार वाल्मिकराव बावचे, साईसंस्थानचे प्रताप कोते, अरविंद कोते, किशोर कोते, कैलास कोते यांच्यासह नागरिक मदतीला धावुन आले. 

शिर्डी व राहाता नगरपंचायतच्या अग्नीशामक बंबास कळविल्याने दोन्ही बंब क्षणात हजर झाले. शिर्डी नगरपंचायतचे अग्नीशामक अधिकारी विलास लासुरे तसेच दगु खरात, अशोक गांगुर्डे, विजय गायकवाड यांनी शर्थीचे प्रयत्न करुन वेळीच आग आटोक्यात आणल्याने जवळपासच्या अन्य दोन इमारती तसेच सदर इमारतीच्या वरच्या बाजुस असणाऱ्या रुम आगीपासुन बचावल्या. एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलास यश आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.