पंतप्रधानांनी भाषणापेक्षा प्रत्यक्ष विकास कामांवर भर द्यावा - आ.थोरात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाकिस्तानी क्रिकेटचा एकेकाळचा वेगवान गोलंदाज आणि जिगरबाज कर्णधार इम्रान खान लवकरच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसेल. बहुमत निर्णायक नसलं तरी त्यासाठी कमी पडत असलेल्या १७ जागांसाठी अन्य छोटे पक्ष त्याला पाठिंबा देतील आणि इम्रान सरकार स्थापन करेल यात शंका नसून कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी फक्त भाषणांपेक्षा प्रत्यक्ष विकास कामांवर भर द्यावा अशी खोचक टिप्पणी काँगे्रसचे राष्ट्रीय नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Loading...
आपल्या पहिल्या टीव्ही प्रसारणात सौहार्दाने असला तरी काश्मीर प्रश्­नाचा इम्रानने उल्लेख केलाच. पाकिस्तानातील प्रत्येक राज्यकर्त्याने काश्मीर प्रश्­न इतका भावनिक करुन ठेवला आहे कि त्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहणं कुणालाच राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. इम्रान त्याला अपवाद नाही. वास्तविक पाकिस्तानी अर्थव्यवस्था आज इतक्या वाईट अवस्थेत आहे. भारत-पाकिस्तान व्यापार वाढण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करु असे इम्रान म्हणाला. ही जबाबदार आणि परिपक्व भाषा आहे.

पाकिस्तानी लष्कराने कालच्या निवडणूकीत मतदानात आणि मतमोजणीत हस्तक्षेप केला असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे. खैबर - पख्तूनख्वा या आपल्या प्रांतात इम्रानने तालिबानला उघड पाठींबा दिला होता. बदल्यात, तालिबानी पाठींब्यावर तिथे तेहरीक- ए - इन्साफचं सरकार आलं होतं,हा इतिहास फार जुना नाही.सईद हफीज तत्सम धार्मिक दहशतवाद्यांनी उभे केलेले पक्ष या निवडणुकीत सपशेल आपटले. पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेला आता आर्थिक स्थैर्य हवं आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. 

इम्रानच्या कालच्या भाषणात त्याने आपल्या निवडणुक जाहीरनाम्याचा पुनरुच्चार केला. नया पाकिस्तान बनवणार. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. नवे रोजगार निर्माण करेल, अशी काही ठळक आश्­वासने त्यात आहेत. इम्रानचा स्वभाव आणि ही आश्­वासनांची भाषा ओळखीची वाटते,असो.जाता जाता व्हॉटसॲप विद्यापीठातून काल कुणीतरी एक विनोद पाठवला. इम्रान खान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता म्हणून काय झालं? आमच्याकडे त्यापेक्षा जोरात 'फेकणारे' आहेत अशी खोचक टीकाही आ.थोरात यांनी यावेळी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.