संगमनेर तालुक्यात रोडरोमिओंची धुलाई !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द परिसरातील रस्त्यावर वा रस्त्याच्या कडेला उभे राहत महिला व मुलींना नाहक त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची धुलाई करत कामशिवाय या परिसरात फिरु नये, अशी तंबी दिली. 

कटके यांनी या रोडरोमिओंना चांगलाच धडा शिकवल्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.. मंगळवारी सकाळी पोलिस निरिक्षक अनिल कटके, गुप्त वार्ता विभागाचे अनिल शेगाळे, हवालदार रोकडे व दोन होमगार्ड समवेत आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. 

Loading...

यावेळी आश्वी खुर्द येथिल महाविद्यालयाकडून येणाऱ्या चौकात काही तरुण टिंगलटवाळी करताना आढळल्याने पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी गाडी थांबवत येथे काय करत आहात, असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. 


या ठिकाणी अनेकवेळा मुलींवर शेरेबाजी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला.. त्यानंतर पोलिस निरिक्षक अनिल कटके व त्यांचे सहकारी आश्वी बुद्रुक येथिल बस स्थानकाजवळ आल्यानंतर त्याही ठिकाणी टिंगलटवाळी करणारे तरुण आढळल्याने त्यांनी या तरुणांना १०० ऊठाबशा काढण्याची शिक्षा देत फटकावले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.