श्रीगोंद्यातील रस्त्यांना “सलाईन’,कामे पूर्ण होण्याआधीच खचले रस्तेअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे नगरपालिकेमार्फत शहरात नगरोत्थान योजनेंतर्गत 33 कोटी रुपयांच्या खर्चातून 17 रस्त्यांची कामे सुरू आहेत. मागील महिन्यात बाजार तळाजवळ झालेल्या रस्त्याला काही दिवसातच खड्डा पडला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रस्त्यालाच “सलाईन’ देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 

Loading...
शहरातील “विकास’ आजारी पडला आहे. त्यामुळे विकासला जी जखम झाली आहे. ती लवकरात लवकर भरून यावी यासाठी खचलेल्या रस्त्याला “सलाईन लावत औषध उपचार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे पालिकेचे बांधकाम सभापती हे या आंदोलनात सहभागी असल्याने त्यांच्याच समोर या आंदोलनात रस्ता कामाचे वाभाडे काढण्यात आले. 

पालिकेत भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या गटाची सत्ता आहे. पालिकेच्या क्षेत्रात 17 रस्त्यांच्या कामासाठी 33 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून कामे सुरू आहेत. शहराच्या बाहेर जाणारे रस्ते साधारणपणे 1 हजार 200 मीटर अंतराचे डांबरीकारण करण्यात येत आहे. 

यातील काही रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या कामाच्या गुणवत्तेबाबत शहरातले विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्ते सत्ताधारी यांना कोंडीत पकडण्यासाठी रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. नुकतेच शिवसेनेच्या वतीने दोनदा आंदोलन करण्यात आले. त्यातच राष्ट्रवादीच्या वतीने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.