मराठा समाजाचा अंत पाहू नये : चंद्रशेखर घुले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणासाठी सुरू करण्सात आलेल्या आंदोलना दरम्यान दोघांचा बळीही गेला आहे. आता तरी राज्य सरकारने मराठा समाजाचा सरकारने आता अंत पाहू नये. तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.


Loading...
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नये. त्यांचे आरक्षण तसेच ठेवत हे आरक्षण द्यावे. मराठा समाजाबरोबरच धनगर व मुस्लिम समाजालाही सरकारने आरक्षण द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. मराठा आंदोलनाविषयी श्री. घुले यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकार मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत चालढकलपणा करत आहे असाही आरोप त्यांनी केला.

आरक्षणासंदर्भात मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. मराठा समाजाच्या ज्वलंत भावना लक्षात घेता तत्काळ सरकारने आता जास्त काळ ओढून ताणून न धरता लवकरात लवकर समाजास आरक्षण द्यावे, या आरक्षणासाठी आणखी किती लोकांचा बळी घेणार? समाजाचा अंत कुठपर्यंत पाहणार? असा सवालही त्यांनी चंद्रशेखर घुले पाटील यांनी केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.