संपूर्ण महाराष्‍ट्रात १ ऑगस्‍टपासून जेलभरो आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला बोलावले तरी सकल मराठा समाजाच्या वतीने कोणीही चर्चेला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्‍यावा. २५ जुलैच्या बंददरम्‍यान दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. 

Loading...
मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांवर कार्यवाही झाली नाही, तर मुंबईसह संपूर्ण महाराष्‍ट्रात १ ऑगस्‍टपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येणार असल्‍याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने देण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाची बैठक शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे पार पडली. या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले आहेत. २५ जुलै बंददरम्यान दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबारसंदर्भात त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.


 त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंददरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा. हे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.