महानगर बँकेला आता गुलाबराव शेळके यांचे नाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील नामांकीत सहकारी बँकापैकी एक असणारी दि महानगर को ऑपरेटीव्ह बॅंक आता गुलाबराव शेळके (जीएस) महानगर को ऑपरेटीव्ह बॅंक या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याचा सहकार विभाग, केंद्र शासन तसेच रिझर्व्ह बॅंकेने या नामकरणास नुकतीच मान्यता दिली असून, मान्यतेचे सर्व कायदेशिर सोपस्कर बॅंकेने पुर्ण केले आहेत. 


बॅंकेचा नामांतरण सोहळा व नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रतीक (लोगो) चिन्हाचे अनावरण रविवार दि. २९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता षण्मुखानंद हॉल सायन मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री व खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष ॲड.उदय शेळके यांनी दिली. 
Loading...

नामांतर सोहळ्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार आनंदराव अडसूळ, आदर्श गाव समीतीचे अध्यक्ष पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आता ही बँक दि जीएस (गुलाबराव शेळके) महानगर को ऑप बँक मर्या. या नावाने ओळखली जाणार आहे. 

सभासद, खातेदार व ठेवीदारांच्या जोडीने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदाणामुळे बँकेची यशस्वी वाटचाल चालू असल्याचे अध्यक्ष ॲड.उदय शेळके यांनी सांगितले. या सोहळ्यास उपस्थित राहाण्याचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष अप्पासाहेब लामखडे, कार्यकारी संचालक मंजुनाथा टी.कांचन व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.