चांगल्या कामामुळे नगरकर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे - आ.संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरात मध्यंतरीच्या काळात अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण केले गेले. मला नाही तर ज्येष्ठ आणि महिलांनीही छळले. आता त्यांचा जनताच हिशोब करील. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित १ बूथ १५ यूथ संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, अशा राजकारणाला मी घाबरत नाही व तुम्हीही घाबरू नका. नगर शहरात केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी व माझे कार्यकर्ते करीत आहेत. आम्हीही राजकारणात फिट आहोत. मी केलेल्या चांगल्या कामामुळे नगरकर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. 
Loading...

गेले ३ महिने जी विकासाची प्रक्रिया थांबली आहे. तिला आता सुरू करून शहराचा विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय होणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. असे आवाहन त्यांनी केले. 

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते म्हणाले,चांगल्या वाईट गोष्टीमध्ये संयम ठेवणारा नेता म्हणजे आ. संग्राम जगताप. नगर शहरामध्ये गेल्या ३ महिन्यांपूर्वी ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी घटना होत्या. या सर्व गोष्टीतून निरपराध म्हणून ते बाहेर आले आहेत. शहरात युवकांचे जाळे भक्कम असल्याने पुढील निवडणुका शहरामध्ये राष्ट्रवादी जिंकणार आहे. बूथ कमिटी युवकांच्या मार्फत भक्कम केल्यास विजय सोपा होईल, असेही ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.