मराठा समाजासाठी आमदारकी पणाला लावू -आ. कांबळे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यभरात सकल मराठा समाजाची जोरदार आंदोलने सुरू असताना मराठा आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केल्यानंतर श्रीरामपूरचे आ.भाऊसाहेब कांबळे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपली आमदारकीपणाला लावू, असे आश्वासन मराठा समाजाच्या बैठकीत दिले.

प्रशासकीय भवन, श्रीरामपूर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन पार पडल्यानंतर आ.कांबळे म्हणाले, आपल्या मतदारसंघासह राज्यातील मराठा बांधवांनी इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे ही अत्यंत रास्त मागणी केलेली आहे. 
Loading...

आजवर ५८ आंदोलने संयमीपणे पार पाडलेल्या या समाजाबाबत शासनाने आधीच निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आजवर आपल्या पाठीशी राहिलेल्या मराठासह मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आपली आमदारकी पणाला लावू, असे सूतोवाच केल्यानंतर आपण आमच्या मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडाव्यात, अशी मागणी मराठा समाजाने केली. 

ॲड.सुभाष जंगले यांच्या यमुना ट्रेडर्स येथे पार पडलेल्या बैठकीत पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे कांबळे हे आमदार असून त्यांनी मराठा समाजाच्या तीव्र भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासनाला कळवाव्यात आणि सरकारने निर्णय न घेतल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.