शिर्डीत गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी करणारी महिलांची टोळी पकडली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त साई दर्शनासाठी साईमंदिर व परिसरात झालेल्या गर्दीत साईभक्त महिलांची दागिने, पर्स लंपास करणारी टोळी साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले आहे. साईसंस्थानच्या सुरक्षा विभागाने पकडलेल्या महिलांच्या टोळीतील १४ महिला व दोन पुरुषांना शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले असून शिर्डी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

मोठी टोळी वेळीच जेरबंद झाल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.२७) गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी साईमंदिरात व परिसरात गर्दी केली होती. 


सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थानचे सुरक्षा विभागप्रमुख पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील सुरक्षारक्षक नाना हासे, प्रकाश कर्पे, दत्तात्रय सुपेकर, समाधान बनकर, सुरेश काटकर हे राऊंड घेत असताना त्यांना काही महिला साईभक्तांचे मनीपर्स चाचपत असताना निदर्शनास आले. त्यांना सुरक्षा कार्यालयात आणून चौकशी केली असताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने, मनीपर्स, पाकीटमारी करण्यासाठी आल्याचे दिसून आले. 
Loading...

सुरक्षा विभागाने ताब्यात घेतलेल्या महिला सुशिला कुमारी रविकुमार (वय २१), लक्ष्मी मनोज (वय २१), ज्योती संदीप (वय २०), मिना मंगल (वय ३५, सर्व रा. अरतपूर, कच्छी बस्ती रंजीत नगर जयपूर), राजकुमारी पवन (वय ३८, रा. आलवर लक्ष्मीनगर), पिंकी मंगल (वय २०, रा. अरतपूर रंजीतनगर, जयपूर), मोनोदेवी दीपक (वय २५), विमलेश कुमारी अनिल कुमार (वय ३०), लिलावती मुकेशकुमार (वय २५), सोनू सुकबीर (वय ३०, सर्व रा. आलवर, लक्ष्मीनगर), काली संतोष (वय ५५, रा. दिल्ली) यांच्यासह दिल्ली येथील एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.