सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : अनिल राठोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्­नांना महत्व दिले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडविण्यासाठी सर्वस्वपणाला लावणारे शिवसैनिक हे जनतेला जवळचे वाटतात. शिवसेनेने नेहमीच सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्­नांना प्राधान्य देऊन ते सोडविल्या आहेत. केंद्रात व राज्यात शिवसेना जरी सत्तेत सहभागी असला तरी सर्वसामान्यांच्या प्रश्­नांसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. 

शेतकरी आंदोलन, विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्­न, विद्यार्थ्यांचे प्रश्­न असा विविध पातळीवर सरकारला जाब विचारुन प्रसंगी आंदोलन करुन ते सोडविले आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या मागे आज जनता मोठ्या प्रमाणावर आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे शिवसेनेच्यावतीने महाआरती करण्यात आली. याप्रसंगी उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, शहरप्रमुख दिलिप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गटनेते संजय शेंडगे,आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना उपनेते राठोड म्हणाले, आज मनपात शिवसेनेची सत्ता आहे. त्या माध्यमातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्­न सोडविण्यासाठी महापौर सुरेखा कदम व सर्व नगरसेवक प्रयत्न करत आहेत. राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास सुरु आहे. परंतु काही अपप्रवृत्ती यात विघ्न आणू इच्छित आहेत, परंतु त्यांच्या हे मनसुबे पूर्ण होऊन देणार नाही. 

शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्याही आता वाढत असल्याचेही उपनेते राठोड यांनी सांगितले.याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाले, आज मी शिवसेनेची महापौर म्हणून काम करत आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रश्­नांना प्राधान्य देऊन विकासकामे सुरु आहेत. 

शहराच्या प्रत्येक भागातील मुलभूत सुविधा सोडवून नागरिकांचे जीवन सुसहाय्य करण्यात येत आहे. शहराच्या विकासात भर घालण्यासाठी सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त निधी शहराच्या विकासासाठी आणत आहोत. यासाठी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मंत्र्यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे शहर विकासाला चालना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.