आमदारकीचे डोहाळे लागलेल्या नेत्यांना जनताच जागा दाखवेल - आ. शिवाजी कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदारकीचे डोहाळे लागलेल्या नेत्यांना जनताच जागा दाखविणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवावर आपले राजकारण असल्याने माझ्या आमदारकीला कशाचीही भीती नसल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. बाभूळगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 


Loading...
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील होते. जनसुविधा व 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत 12 लक्ष रुपये खर्चाचे सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, 12 लाख रुपये खर्चाच्या पथदिवे कामाचे उद्घाटन, तसेच 13 लक्ष रुपये खर्चाचे स्मशानभूमी विकास आदी कामाचे भूमिपूजन आ. शिवाजी कर्डिले, अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

आ. कर्डिले म्हणाले, आमदारकीच्या माध्यमातून मतदार संघाचा विकासाबरोबर जनतेची सेवा करण्याचे काम आपण करत आहोत. अडीअडचणींची सोडवणूक केल्याने जनता आपल्याबरोबर आहे. 


शासनाच्या विविध योजनेंतर्गत मतदार संघातील विकासकामांसाठी भरीव निधी आणण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅड. पाटील यांनी विकास कामांना पाठिंबा देणार्‍या लोकप्रतिनिधीला आपला पाठिंबा आहे.राहुरीची बंद पडलेली कामधेनू आ. कर्डिले यांच्या विशेष सहकार्यामुळे सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.