अंगावर पाणी उडाल्याने दुचाकीस्वारास पाच जणांकडून मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील प्रेमदान चौक परिसरात दुचाकीवरून जात असताना अंगावर पाणी उडाल्याने दुचाकीस्वारास पाच जणांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी प्रेमदान चौकात एका दुचाकीस्वाराकडून अंगावर पाणी उडाल्याने त्याला पाच जणांनी मारहाण केली आहे. यामध्ये अजय सुरेश नेटके (वय २३, रा. खंडोबा मंदिराजवळ, सावेडी, नगर ) हा गंभीर जखमी झाला आहे. तो प्रेमदान चौकातून जात असताना रस्त्यावरील पाणी अक्षय वाकळे व शाहरूख शेख या दोघांच्या अंगावर उडाले होते. 

याचा राग येवून दोघांनी इतर तिघांना बोलावून पाचही जणांनी अजय नेटके याला शिवीगाळ करीत लाकडी दांडके व विटांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत नेटके जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरून अक्षय वाकळे, शाहरूख शेख, हनीफ सलीम शेख, इम्रान शेख, आरीफ सलीम शेख (रा. सावेडीगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.