देशभरातील डॉक्टर आज संपावर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार आहेत. राष्ट्रीय वैद्यक परिषद बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हे 

विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. सुमारे तीन लाख डॉक्टर्स संपात सहभागी होणार असल्याने देशभरातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Loading...
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि इतर डॉक्टरांच्या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. आयएमएने संपाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार आणू पाहत असलेले 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयक डॉक्टरांच्या विरोधात आहे, म्हणून आमचा त्याला विरोध नाही. 

तर हे विधेयक गरीबांच्या विरोधी असल्याने संसदेने मंजूर केल्यास सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न देखील केवळ स्वप्नच राहील, अशा तरतुदी आहेत.आजच खाजगी वैद्यकीय शिक्षणाची फी प्रचंड आहे. त्यातच १५ टक्के जागा मॅनेजमेंटच्या ताब्यात असल्याने भरमसाट डोनेशन आणि फी द्यावी लागते. 'नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये मॅनेजमेंटला तब्बल ५० टक्के जागा दिल्या आहेत. यावरून वैद्यकीय शिक्षणाची सोय फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठी सरकार करत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.