पाथर्डीच्या कांदा व्यापाऱ्याची १ कोटीची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- परदेशात कांदा पाठविणाऱ्या व्यापाऱ्याने पाथर्डीच्या किरकोळ कांदा व्यापाऱ्याला ९६ लाख ८० हजार २३८ रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे किरकोळ कांदा व्यापारी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील संजय पाराजी वांढेकर हे कांदा व्यापारी आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कांदा विकत घेवून तो माल परदेशातील व्यापाऱ्यांना विक्री करायचा त्यांचा व्यवसाय आहे. 

एक जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत वांढेकर यांनी बापु एस्मोशिरस (रा.चेन्नई, तामिळनाडू), शशिकारण नागराज कोलबस (श्रीलंका.एलबीई व ट्रान्सपोर्ट राहुल मुंबई),अरुणाचलन उन्नीकोरीन (तामिळनाडू) यांना कांदा दिला. त्यांनी वांढेकर यांना कांद्याची काही रक्कम दिली. मात्र राहिलेली ९६ लाख ८० हजार २३८ रुपयांची रक्कम वेळोवेळी मागूनही दिले नाहीत. 


मात्र पैसे आज ना उद्या मिळतील, या आशेवर वांढेकर अनेक दिवस थांबले.मात्र आता पैसे मिळत नसल्याची खात्री झाल्याने संजय वांढेकर यांनी गुरुवारी रात्री पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वरील चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर हे तपास करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.