काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे,प्रदेशाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब थोराताना संधी ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तरुण व आर्थिक ताकद असलेल्या मराठा नेत्यांचा शोध घेतला जात अाहे. पुढच्या दोनएक महिन्यांत राज्याचे व मुंबई काँग्रेसचे नेतृत्व नव्या दमाच्या नेत्यांच्या हाती जाणार आहे. सध्या माजी मुख्यमंत्री व खासदार अशाेक चव्हाण यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे, तर मुंबईचे नेतृत्व संजय निरुपम यांच्याकडे आहे. 
Loading...


प्रदेशाध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. गरज भासली तरच नेतृत्व बदल केले जातात. अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढवण्याचा धोका पक्षश्रेष्ठी पत्करू इच्छित नाहीत. चव्हाण यांच्या जागी हर्षवर्धन पाटील (इंदापूर), बाळासाहेब थोरात (अहमदनगर)प्रतीक पाटील (सांगली), सतेज ऊर्फ बंटी पाटील (कोल्हापूर) आणि  या चौघांची नावे श्रेष्ठींनी अंतिम केलेली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

तरुण, स्वच्छ आणि मोठी आर्थिक क्षमता असलेल्या व्यक्तीच्या हाती राज्याचे नेतृत्व सोपवले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष न बदलता राज्यात विभागवार अध्यक्ष नेमण्याचा काँग्रेसमध्ये विचार केला जात होता. पण, तो विचार आता मागे पडला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांच्या पदांची लवकरच भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.