मराठा आरक्षण श्रीगोंदा तालुक्यातील महिला ग्रा.पं.सदस्याचा राजीनामा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सकल मराठा समाजाच्या आंदोलनास सर्वच स्तरातून जोरदार पाठिंबा मिळत असतानाच, शुक्रवारी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्या पूजा राहुल साळवे. यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देत. मराठा समाज्याच्या आरक्षनाला पाठिंंबा दिला आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका मागासवर्गीय महिलेने असा राजीनामा दिल्यामुळे सर्वत्र या राजीनाम्याची चर्चा होत असून. जातीचे राजकारण करून समाज्यात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांसाठी ही घटना म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे. . पूजा साळवे या मढेवडगाव ग्रामपंचायतीमध्ये वार्ड क्र४ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. 

Loading...
पूजा यांचे पती देखील या आधी मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपक्ष निवडून आलेले होते. पूजा साळवे व राहुल साळवे यांनीशुक्रवारी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याकडे हा राजीनामा सादर केला आहे. मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपासून आंदोलन करत असून, त्यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे. सर्व मराठा समाज आमचे बांधव असून त्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आपण हा राजीनामा देत असल्याचे पूजा साळवे यांनी त्यांच्या राजीनामापत्रात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.