महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२७) दुपारी जाहीर केला असून प्रारूप प्रभाग रचना ७ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.


महापालिकेच्या एका प्रभागात किती सदस्य असणार हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय असून महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेवून जास्तीत जास्त प्रभाग ४ सदस्यांचे करावयाचे असून सर्व प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास १ प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल. अथवा २ प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच आरक्षण निश्चिती चक्रानुक्रमानुसार करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.Loading...
असा असेल कार्यक्रम 
प्रारुप प्रभागरचना ७ ऑगस्ट, राज्य निवडणूक आयोगाकडे १३ ऑगस्टला होणार सादर, प्रारुप प्रस्तावाला निवडणूक आयुक्त १८ ऑगस्टला मान्यता देतील, मागास प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण सोडत २४ ऑगस्ट, प्रारुप प्रभागरचनेची अधिसूचना आयुक्त २७ ऑगस्टला प्रसिद्ध करतील, रचनेवरील हरकती २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकारी सुनावणी १५ सप्टेंबरला घेतील. हरकतीनुसार केलेल्या शिफारशी २४ सप्टेंबरला निवडणूक आयोगाकडे होणार सादर, सूचनांचा विचार करून राज्य निवडणूक आयुक्त २८ सप्टेंबरला निर्णय घेणार, अंतिम प्रभाग रचना व नकाशात बंद करून १ ऑक्टोबरला जाहीर होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.