राहुरी-शिंगणापूर रोडवरील अपघातात महिलेचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी-शनिशिंगणापूर रोडवर ब्राम्हणीतील हॉटेल जिवनप्रितजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात अश्विनी अशोक अजबे (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला. घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, अश्विनी आजबे या आपल्या पुतण्याबरोबर एम.एच.१७ ५५४५ बजाज सीटी १०० दुचाकीवर उंबरे येथे सरकारी दवाखान्यात काही तपासणीकरीता आल्या होत्या.
Loading...

दवाखान्याचे काम आटपून ब्राह्मणीला जात असताना रस्त्यावर असणाऱ्या स्पिड ब्रेकर जवळ अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने गाडीचालक हा रोडच्या खाली तर आश्वीनी आजबे या रोडवर पडल्या. स्पीड ब्रेकरच्या साईडला असणाऱ्या दगडाचा मार डोक्याला लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. तात्काळ उपचारासाठी त्यांना राहुरी येथे नेले. प्राथमिक उपचारानंतर शिर्डीला हलविण्यात आले परंतु पुढील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.