तोडफोड व दगडफेक प्रकरणी ३५०-४०० जणांविरुध्द गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ३५०-४०० जणांविरुध्द गुन्हा दाखल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकरीता बुधवार दि. २५ रोजी बंद पुकारला होता. या आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागल्याने आंदोलकांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी एमआयडीसी व कोतवाली पोलिस ठाण्यात सुमारे तिनशे आंदोलकांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पो.ना.मच्छद्रिं पंढरकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, नगर-मनमाड रोडवरील विळद बायपास येथे सुमारे १५० ते २०० जणांच्या जमावाने वाहतूक अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच जमावातील आंदोलकांनी कांकरिया शोरूमवर दगडफेक केली. 
Loading...

तेथील शोरूममधील गाड्यांचे नुकसान केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोमनाथ कराळे व आकाश वायकर यांच्यासह अन्य १५० ते २०० जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.

तर इंपिरिअल चौक, स्वस्तिक चौक आणि रेल्वेस्टेशन येथे दगडफेक केल्याप्रकरणी सागर सुभाष ठोंबरे (माळीवाडा), ओंकार घोलप (माणिनगर), अमोल सुरसे (नालेगाव), अमन ओमप्रकाश तिवारी (पाईपलाईन रस्ता, हडको), निरज बाबासाहेब कराळे (टी.व्ही.सेंटर म्युनसिपल कॉलनी), संकेत सूर्यकांत दगडे (पाईपलाईन रोड), योगेश सुधीर वाबळे (टी.व्ही.सेंटर म्युनसिपल कॉलनी) आणि प्रवीण भाऊसाहेब अकोलकर (मोहिनीनगर, केडगाव) तसेच अज्ञात ५० जणांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.