जामखेड नगराध्यक्षांची १ ऑगस्टला निवड पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची कसोटी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेडच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा कालावधी ८ ऑगस्टला संपत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १ ऑगस्टला निवड होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी (दि.२७ जुलै) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 


Loading...
जामखेडचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती केली आहे. दि.२७ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. व त्याच दिवशी छाननी होऊन वैध उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज छाननीत फेटाळले तर अपील दाखल करण्याची मुदत (दि.३० जुलै) सोमवार सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. 

त्याच दिवशी सायंकाळी अध्यक्षपदासाठी वैधरित्या नामनिर्देशन सदस्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑगस्ट रोजी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी १ ऑगस्ट रोजी १० ते १२ या कालावधीत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावे. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.जामखेड नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. 


यासाठी गटनेत्या विद्या वाव्हळ व निखिल घायतडक हे दोघे दावेदार आहेत. तर उपनगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी होण्याची शक्यता असून, याकरिता १५ नगरसेवक इच्छुक आहेत. कोण अध्यक्ष होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री ना.शिंदे यांचा मतदारसंघातील नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया असल्याने महत्त्व आले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.