आ. औटींच्या कार्यालयासमोर आंदोलकांची घोषणाबाजी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाकडे शिवसेनेचे आमदार विजयराव औटी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. आ. विजय औटी यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आ. औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी कण्यात आली. 

Loading...
तर दुसरीकडे मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलन करण्यात आले असता, आ. औटी यांनी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाकडे पाठ फिरवित या आंदोलनाचा दखल घेतली नसल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. राज्यातील तीन आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामा दिला असून, पारनेरचे लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली ज़ात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.