नागपुरातल्या पाण्याने ना. राधाकृष्ण विखेंना डेंग्यूची लागण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्­ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समजते. लोणी येथील त्यांच्या राहात्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Loading...
नागपूरमध्ये नुकतेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. यादरम्यान, नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विधीमंडळ परिसरात पाणी तुंबले होते. या पाण्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधाकांचीही त्रेधातिरपट उडाली होती. एवढेच नाहीतर विधीमंडळाच्या सदस्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत अधिवेशनाला पोहोचावे लागले होते. 

या साचलेल्या पाण्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याचे बोलले जात आहे. नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना कणकण जाणवत होती. अधिवेशन संपल्यानंतर ते पंढरपूला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार होते. परंतु, प्रकृती अस्वस्थ झाल्याने ते गेले नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.