पाथर्डीत लाकडी दांडक्याने मारहाण करून खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील भांडणाच्या कारणावरून डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

Loading...
शहराजवळ बाबूजी आव्हाड महाविद्यालयासमोर दोन कुटंबे राहत असून, ते झाडलोट करून उपजीविका करतात. या दोन्ही कुटुंबात यापूर्वीही वाद होत होते. एका नातलगाच्या कार्यक्रमातही किरकोळ वाद झाले हाते. मंगळवारी रात्री आठ वाजता दोन्ही कुटुंबांत पूर्वीच्या भांडणावरून पुन्हा वाद निर्माण झाला. 

या वेळी अय्यूब उस्मान सय्यद यांना समर सालाद सय्यद व शकूर सालाद सय्यद यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डोक्याला मार लागल्याने अय्यूब सय्यद गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शहानवाज अय्यूब सय्यद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून समर सय्यद व शकूर सय्यद रा. पाथर्डी यांना अटक केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.