बनावट नोट चलनात वापरल्याप्रकरणी श्रीगोंद्यातील एकास तीन वर्षे सक्तमजुरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दोन हजार रुपयांची बनावट नोट चलनात वापरल्याप्रकरणी आरोपी रविंद्र गंगाराम ससाने (रा. ससाने वस्ती, श्रीगोंदा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत एस. सातभाई यांनी दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. 

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि. १२/१२/२०१६ रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास श्रीगोंदा येथील चंद्रमा पेट्रोलपंपावर आरोपी रविंद्र ससाने याने कामगार नंदू मल्हारी हुंडेकरी याचेकडे १०० रु. चे पेट्रोल टाकून दोन हजार रुपयांची नोट दिली. त्यानंतर ती नोट खोटी असल्याचे कामगाराच्या लक्षात येताच त्याने मॅनेजर उत्तम शंकर रोकडे यांचेकडे खोटी नोट घेवून गेला. 
Loading...

सदर नोट खोटी असल्याची आरोपीकडे विचारपूस करता तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर उत्तम रोकडे याने याबाबत रविंद्र ससाने विरुध्द फिर्याद दिली. या गुन्ह्यात तपासात सचिन सुनील शिंदे व अमोल साहेबराव काळे हे सुध्दा आरोपी निष्पण्ण झाले. 

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात उत्तम रोकडे, कामगार हुंडेकरी, नितीन आनंदकर, पोहेकॉ वनाजी धामणे यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर गुन्हा हा देशाच्या चलनी नोटाविरुध्द गंभीर स्वरुपाचा असल्याचे निष्पण्ण झाले. 

त्यावर सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन नाायालयाने आरोपी रविंद्र ससाने याला भादवि कलम ४८९ बी नूसार तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच भादवि कलम ४८९ सी नूसार दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर उर्वरीत दोन आरोपी विरुध्द पुरेसा पुरावा नसल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.