मराठा आरक्षणासाठी दोघांनी सोडली आमदारकी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कन्नड-सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांकडे मेलवरून राजीनामा पाठवला. दरम्यान . आ. जाधव यांनी इतर आमदारांनाही फोन करून या गंभीर प्रश्नावर तुम्ही कधी राजीनामा देता, अशी विचारणा केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

Loading...
सरकारने बुधवारी (दि. २५) दुपारपर्यंत आरक्षणासंबंधी अध्यादेश काढला नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे आ.जाधव यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेची वेळ संपताच त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणस्थळीच सदस्यांसमोर राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन वर्षांपासून समाज शांततेच्या मार्गाने मोर्चे, आंदोलन करत होता. मात्र समाजाच्या मागण्यांकडे सरकार चालढकल करत असल्याचे समोर येत आहे. समाजाचा संयम सुटत चालला असून सोमवारी आरक्षणाच्या मुद्यावरच गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेत आपला जीव दिला होता. 

याची दखल घेत आमदार जाधव यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. त्यांच्या इशाऱ्याची सरकारने दखल न घेतल्याने त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.