लवकरच जीएसटी चोरी करणे होणार अशक्य !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) व्यवस्था सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी सरकारच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा कमीच कर जमा होत असल्यामुळे सरकार चिंतेत आहे. एका बाजूला जमा आणि खर्चातील वाढती तूट रोखण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला जीएसटीमधून अधिकाधिक कर वसूल करण्याचे आव्हान, अशा दुहेरी आव्हानांचा सरकार सध्या सामना करत आहे. 


Loading...
यामुळे जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) संस्था कर चुकवणाऱ्यांच्या मुसक्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आवळता येतील, असे आयटी तंत्रज्ञान विकसित करत आहे. नवे आयटी तंत्रज्ञान तयार झाल्यानंतर कर चुकवणारे तसेच ज्यांनी आयटी रिटर्न फायलिंग करणे थांबवले आहे त्यांची मानगूट धरणे सरकारला सोपे जाणार आहे.

सध्या जीएसटी रिटर्न अर्जांची संख्या एकूण नोंदणी झालेल्या संख्येशी मेळ घेत नसल्याचे जीएसटीएनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जीएसटी चुकवणाऱ्यांचा माग घेता येईल, असे तंत्रज्ञान अधिकाऱ्यांच्या हाती देण्याची जीएसटीएन जोरदार तयारी करत आहे. अशाच प्रकारचे तंत्रज्ञान आयकर रिटर्न भरणे थांबवलेल्यांचा माग घेण्यासाठी देखील वापरण्यात येणार आहे. 


अनेक राज्यांच्या अर्थ मंत्रालयांकडून करसंबंधित नियमांचे अनुपालन होत नसल्याची तक्रार केंद्र सरकारकडे आली आहे. यामुळे सरकार कर चुकवणारे आणि अनुपालन न करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी गंभीरपणे विचार करू लागले आहे. त्याचाचा एक भाग म्हणून जीएसटीएनने आधुनिक आयटी तंत्रज्ञान विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.