मराठा आरक्षण ; शिर्डीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ मराठवाड्यातील कृष्णा गंभीरे या २४ वर्षीय तरूण साईभक्ताने आज शिर्डीत संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने साईसंस्थानच्या रूग्णालयात दाखल करून उपचार केल्याने त्याची परिस्थिती नियंत्रणात आहे..


Loading...
कृष्णा आबासाहेब गंभीरे (रा. इटपूर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवाशी असून तो शेतीव्यवसाय करीत आहे. कृष्णा हा साईभक्त असून गेल्या चार वर्षापासून पायी चालत शिर्डीला येतो. सालाबादप्रमाणे आज चालत तो शिर्डीला आला असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यास मुख्यमंत्री चालढकल करीत असल्याने त्याने विषप्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वेळीच साई संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू केल्याने त्याची प्रकृती स्थीर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.