कोतकरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले भानुदास कोतकर यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी दि. २ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपीचे वकिल ॲड. महेश नवले यांनी युक्तीवादासाठी मुदत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. 

केडगाव येथे मनपा पोटनिवडणुक निकालाच्या दिवशी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संग्राम संजय कोतकर यांच्या फिर्यादीवरून कट करणे, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Loading...
या गुन्ह्यात अटकेत असलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकर यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जावर मंगळवारी (दि.२४) जिल्हा व सत्र न्यायाधीश देशपांडे यांचेसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. 

यावेळी आरोपीचे वकिल ॲड. महेश तवले यांनी कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी वेळ देण्यात यावा तसेच कागदपत्रे मिळाल्यानंतर युक्तीवाद करण्यात येईल असे सांगितल्याने कोर्टाने पुढील सुनावणी दि. २ ऑगस्टला ठेवली आहे. यावेळी सरकारपक्षातर्फे अति. सरकारी वकिल ॲड. ढगे उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.