मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा – आ.बाळासाहेब थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रतिष्ठीत राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल आयोजित केलेला भव्य सत्कार समारंभ रद्द करुन बाळासाहेब थोरात यांनी मराठा मोर्चाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला.

अमृत उद्योग समूह व संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे हजारोंच्या उपस्थित भव्य दिव्य व आखिव रेखीव सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली होती. परंतू महाराष्ट्रात पेटलेल्या मराठा आंदोलनाने आरक्षणाची आग्रही मागणी केली होती. 


Loading...
यात औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली या युवकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन मराठा आरक्षणासाठी बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांनी जाहिर पाठिंबा दिला. संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढला. यामध्ये आमदार थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला. यशोधन कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चाने शांततेत जावून प्रांतकार्यालयावर निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार थोरात म्हणाले कि, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने रायातील पाच लाख पेक्षा जास्त कुटुंबाचा सर्व्हे करुन 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या आरक्षणात सर्व समाजातील आर्थिक, मागास घटकांना सामावून घेतले होते.

एकत्रित पध्दतीने आरक्षणाच्या या निर्णयाला काहींनी कोर्टात आव्हान दिले. या निर्णयाची रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची होती. शासनाने याकडे दुर्लक्ष केले. तरी शासनाने तातडीने आरक्षण जाहिर करण्याचे मागणी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.