लुटेरी दुल्हन १८ तरुणांसोबत विवाह करणाऱ्या महिलेस अटक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तरुणांना विवाहाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा उत्तरप्रदेश पोलिसांनी भंडाफोड केला आहे. छत्तीसगड येथून चालवल्या जात असलेल्या टोळीची सूत्रधार आणि तिचा पती हे एका साध्वीच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवत असत. 

लग्नाच्या दोन-तीन दिवसांनंतर हे लोक बलात्कार, अपहरण, जबरदस्तीने विवाह अशा आरोपांची भीती दाखवून लाखो रुपयांची रक्कम वसूल करून फरार होत असत. या टोळीला अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. 

Loading...
या टोळीची प्रमुख निर्मला ठाकूर हिने बांदा येथील कैलाशपुरी वस्तीतील घन:श्याम याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या बदल्यात साध्वी मालती शुक्ला, ममता द्विवेदी आणि तिचा पती निरंजन द्विवेदीने घन:श्यामकडून ५० हजार रुपये घेतले. 

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी निर्मलाचा कथित पती कुलदीप हा घन:श्यामकडे पोहोचला आणि त्याने आपली पत्नी निर्मलाचे अपहरण केलेले असून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला असल्याचे म्हणत दोन लाख रुपये दे, अन्यथा आपण पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी दिली

परंतु घन:श्यामने याला नकार दिला. यामुळे कुलदीपने घन:श्याम व त्याच्या भावाविरुध्द कोतवाली पोलिसांत अपहरण, सामूहिक बलात्काराची केस दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्वांनाच अटक केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.