पाथर्डीत किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे किरकोळ कारणावरून केशव दशरथ जऱ्हाड अंदाजे (वय ५० वर्षे) यांचा सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला. या घटनेमुळे चिचोंडी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जऱ्हाड यांचा गावातीलच एका व्यक्तीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर जऱ्हाड यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला असल्याचे समजले आहे. जऱ्हाड यांचा खून झाल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. 
Loading...

त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काही वेळातच पाथर्डीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मानगावकर यांनी पुढील तपासाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. खुनाचे नेमके कारण पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.